केवढ्या झपाट्याने काळ बदलत जातो ना! आत्ता परवा परवा पर्यंत आपण काळाशी
एकदम सुसंगत चाललो आहोत असं वाटत होतं. किंबहुना कॉलेज सोडून खूप वर्ष गेली
आहेत असं वाटतच नव्हतं. कॉलेज, ते डेज सेलिब्रेशन्स, अर्चिज आणि ग्रीटवेल
मधल्या फेऱ्या, ती फ्रेन्डशिप मागणं देणं प्रकरणं, लेक्चर्स बंक करणं हे
आत्ता आत्ताच होऊन गेलं असं वाटायचं. अजूनही फर्गसन कॉलेज रोडवर फिरताना
कधी अल्ट्रा मॉडर्न कपड्यातल्या, सिगरेट ओढत फिरणाऱ्या मुली बघितल्या तरी दचकून जायला नाही होत. “चिल” म्हणून पुढे जातो आपण.
मुलीच्या जन्मानंतर काही महिने बरेच पिक्चर्स बघायचे राहून गेले होते. मग एक दिवस एक गाणं चालू असताना ‘असीन’ ला ओळखलं नाही तेंव्हा अचानक आपण काळाच्या मागे पडलो कि काय असं वाटलं. किती गोष्टी ह्या काही महिन्यात बदलल्या होत्या. मुलगी व्हायच्या च्या अगोदर wide bottom jeans ची fashion होती. मुलगी झाल्यानंतर काही महिन्यांनतर मी नवीन विकत घ्यायला गेले आणि दुकानदाराला तशी jeans मागितली तर त्यावर २५% सूट आहे असं सांगितलं आणि मग कळलं कि आता नेरो bottom jeans ची fashion आलीय. शेवटी किमान पिक्चर्सचा backlog तरी भरून काढू म्हणून वेळात वेळ काढून गजनी आणि रब ने बना दी जोडी असे दोन्ही पिक्चर्स रोज १५ मिनिटे अशा हिशेबाने पूर्ण केले. शेवटी काळाशी सुसंगत राहायलाच हवं.
पण अशी कितीही धडपड केली तर काळ हा त्याच्या त्याच्या मर्जीनेच चालत असतो आणि आजकाल तर तो पळतोय असं वाटतंय. आजोबांनी काही वर्षांनी का होईना आत्त्याचा आंतरजातीय विवाह मान्य केला. कधीतरी वेगळ्या धर्माचा मित्र बघून वडील म्हणाले कि निदान आपल्या आपल्या धर्मात तरी लग्न करावीत. मागच्या पिढीतल्या लोकांनी आपापल्या मुलांची आंतरजातीय लग्ने सर्रास मान्य केली, आनंदाने लावून दिली. लिव इन रेलेशन्शीपकडे एक fact किंवा काळाची गरज म्हणून आपण बघू शकतो. शेवटी आपण स्वतःला modern समजत असतो किंबहुना आपण असतोच.
त्याहीपलीकडे जाऊन मी मध्ये गमती गमतीत म्हणाले आता पुढच्या पिढीतल्या मुलींनी केलंच लग्न (पुढची पिढी एवढ्या सर्रास लग्न करतील का हा प्रश्नच आहे !!) तर अगदी मंगळवारच्या का होईना मुलाशीच करावं म्हणजे झालं!!!
समलिंगी विवाह कायदा अमेरिकेत मागच्या महिन्यात पास झाला. भारतात कधी ना कधीतरी तो होणारच. कितीही शास्त्रोक्त विचार केला तरी अशा गोष्टी मान्य नाही होत आणि कितीही मान्य झाल्याचा आव आणला तरी जर त्याचं लोण आपल्या दारात येऊन पोचलं तर किती जण तो आव टिकवून ठेवू शकतील प्रश्नच आहे.
काळ आपल्या धावण्याच्या दोन पावले पुढेच असतो का? आपण स्वतःला कितीही modern modern म्हणवून घेतले तरी आपण आपल्या पिढीतले modern असतो बहुतेक ! त्यामुळेच generation gap ही असतेच असते! नाही का ?

No comments:
Post a Comment