Sunday, February 28, 2016

‘तुझे याद न मेरी आई किसीसे अब क्या केहेना’



साधारण पंधरा सोळा वर्ष झाली असतील आम्ही तिघी तिच्याकडे सांगलीला गेलो होतो. मैत्रिणी मैत्रिणी फक्त. तिचं घर बघण्यासाठी. तेंव्हा तिकडे सांगलीला कुछ कुछ होता है पिक्चर लागला होता. आधी बघितला होता कि नाही लक्षात नाही पण बघायला गेलो. मला तर अजूनही कोणताही पिक्चर बघताना रडायला येऊ शकतं. आणि तेंव्हा तर हार्डली २३-२४ वर्षांच्या असू सगळ्याच. ‘तुझे याद न मेरी आई किसीसे अब क्या केहेना’ गाणं सुरु झालं आणि आम्ही चांगल्याच मुसमुसायला लागलो. गाणं मोठं होतं... काजोल पांढरा शुभ्र कुडता आणि त्यावर लाल रंगाचा दुपट्टा घेऊन टर्म अर्धी टाकूनच घरी जायला निघते, ट्रेन मधूनच तो लाल दुपट्टा राणी मुखर्जीच्या अंगावर टाकून देते. उफ्फ...... भरपूरच रडलो मग..... grin emoticon

मध्ये खूप वर्ष गेली. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. रवींद्रनाथांच्या कवितेतल्या ओळीसारखं "That which was once sorrow, is now peace." हे वय आलं. खूप वर्षांनी पुन्हा एकदा निवांत भेटलो आणि त्या रडण्याची आठवण काढून बेदम हसलो. एवढे का रडलो होतो तेही आठवत नाही. (वर्ष आणि महिना नक्की लक्षात आला तर आठवेलही कदाचित!)

ह्या वेळेस बेंगळूरूला मुलं थोडी मोठी झालीत असं म्हणत त्यांना न घेता एकट्याच गेलो. दोन चार दिवसात नवरे तर काही खास आठवण काढत नाहीत आणि आता कोणी आठवण काढत नाही म्हणून रडण्यासराखीही स्थिती राहिली नाही. पण नेमकं दोघींच्याही मुलांनी आपापल्या आयांची मुबलक आठवण काढलीच. माझी लेक तर जी ‘तू जा अशीही तू मला सारखी ओरडत असतेस’ असं म्हणाली होती ती दुसर्याच दिवशी भावूक झाली’ अर्थात हे मला आल्यावर पूर्ण कळलं. एक सर्कल पूर्ण झालं. कधीतरी असं होतंच "That which was once sorrow, is now peace."

No comments:

Post a Comment