Sunday, February 28, 2016

सिंड्रेला



Disney चे सिनेमे काय अफलातून असतात! अजून फ्रोझन मनातून जात नाहीये तोच सिंड्रेला! फ्रोझन ने दिलेला  an act of true love  is the key to control  the power. हा संदेश काय सुंदर होता. मला नेहमीच वाटतं. आपल्या कथांमध्ये जसे संदेश असतात, अगदी संदेश नाहीत तरी त्यातूनकाहीतरीमिळतं, तसं ह्या अभारतीय परीकथांमध्ये फक्त जादू, राजकुमार असंच का असतं? त्यात काहीच संघर्ष नसतो. कधीतरी कुणीतरी राजकुमार येतो, सगळी दुःख दूर करतो, बेडकाचा राजकुमार होतो वगैरे वगैरे. पण फ्रोझन आणि सिंड्रेला ने खूप छान सांगितलं. अगदी थोडक्यात. त्यातल्या परीकथेला धक्का लावता. तुम्ही मुल असाल तर परीकथा बघा, तुम्ही मोठे असाल तर तो सकारात्मक भाव मुलांना हायलाईट करा आणि घेऊन बाहेर पडा.

फक्त मनोरंजनापेक्षा मला नेहमीच असे सकारात्मक भाव देणारे पिक्चर्स आवडतात. अगदी अतिशय कठीण परिस्थितीतून मार्ग काढणारी पात्र. स्वतःवर जाम खुश असणारी जब वी मेट  मधली गीत असुदेत किंवा sound ऑफ music मधली मारिया किंवा the shawshank redemption मधला Andy , life is beautiful मधले वडील आणि जादुव्यातिरिक्त प्रेम आणि मैत्री ह्यावर नितांत विश्वास ठेवून अंतिम विजय मिळवणारं Harry Potter चं त्रिकुट आणि इतर.

सिंड्रेला असाच समोर येतो. सगळ्यांना माहित असलेली नेहमीची कथा. दाखवून दाखवून काय वेगळ दाखवणार. अर्थातच आई वडील गेल्यानंतरचं तिचं दुःख, तिचं जुनं घर, दुष्ट सावत्र आई आणि बहिणी हे सगळं सुंदरच. राजकुमारा बरोबरचा ball , तिचा गाऊन, तिचे काचेचे बूट अगदी आपल्या डोळ्यासमोर असतात तसे .....

पण “an act of true love  is the key to control  the power” ह्यासारखा सिनेमाभर ठसत राहतो तो मृत्युसमयी सिंड्रेलाच्या आईने सांगितलेलं गुज -  प्रेमळ आणि धैर्यवान राहा’ “be kind and have courage”. (अच्छा सोचोगी तो अच्छाही होगा तुम्हारे साथ, मला पुन्हा जब वी मेट आठवतो)  ती तशीच कायम राहते म्हणून विश्वातून सकारात्मक भाव घेऊन म्हातारी परी येत असेल का? ती तशीच असते म्हणून प्राणी मित्र तिची मदत करतात, ती तशीच राहते म्हणून राजाच्या सैनिकांपर्यंत तिचा गुणगुणतानाचा आवाज पोहोचतो. म्हणतात ना पुरी कायनात उस काम मै जुड जाती है !  J  पिक्चर नेहमीची वळणे घेत Be kind and have courage with a faith in little bit magic असं सांगत नेहमीच्या शेवटला जाऊन पोहोचतो. अगदी खरं ! ह्या पिक्चर मधल्या सिंड्रेला साठी हा विश्वास तिच्या आईच्या विश्वासावर होता. तिची आई जिचा सगळ्यावर विश्वास होता अगदी परया असतात ह्यावरही. ती म्हणते I believe in everything.  कोणासाठी हा विश्वास परीकथेतल्या जादूवर असेल किंवा कोणासाठी परमेश्वरावर असेल. आख्या विश्वातली सकारात्मक उर्जा ह्या अर्थाने घेतलं तर परया आणि आपल्या परमेश्वरी कथांमधल्या चमत्कारांमध्ये मला समान सुसूत्रता वाटायला लागली आहे......

विभावरी बिडवे

No comments:

Post a Comment