Sunday, February 28, 2016

समुद्र



एखादा पिक्चर, नाटक कोण कसं घेईल ते सांगता येत नाही. हत्तीची गोष्ट सांगतात ना , डोळे बांधून मुलांना उभं करतात आणि प्रत्येक जण आपल्याला अनुभवानुसार ठरवतं हत्ती कसा आहे ते. सगळ्याच गोष्टींचं असंच असतं. आपला आपला PERSPECTIVE . मागे माझे एक  ओळखीचेतारे जमीन पर बघितल्यावर (तारे जमीन पर बघितल्यावर!!!!!) त्यांच्या मुलाला म्हणाले होतेनीट वाग नाहीतर तुलाही त्या मुलासारखं बोर्डिंग ला पाठवेन   :o  पण असो.
मध्ये समुद्र नाटक बघितलं. त्यावरून आठवलं. कितीतरी ठिकाणी समुद्र नाटक बायकोचं EXTRA MARITAL AFFAIR वर आहे इतकंच लिहिलं. पण हेतिचंनाही तरत्याचंनाटक आहे. आणि तिचं अफेअर हा कथानकात येणारा एक भाग आहे जो अगदीच अपरिहार्य नाही.  
तो एक मस्त माणूस आहे. SUCCESSFUL BUSINESSMAN , FIT AND FINE, handsome !   बायकोवर आणि कुटुंबावर नितांत प्रेम असणारा. बायकोबरोबर दोन चार दिवसांसाठी समुद्रकाठच्या रिसोर्ट वर येतो आणि एक कठीण प्रसंग समोर येऊन उभा ठाकतो. असा  प्रसंग ज्यात त्याचा काहीही दोष नसतो, असा प्रसंग ज्यात त्याचा काहीही सहभाग नसतो, असा प्रसंग ज्याने असहाय्य वाटावं. तो प्रसंग तितकाच गंभीर असतो, जसं कि पालक म्हणून उत्तम कर्तव्य पार पडल्या नंतरही  मुलाचं कुठल्यातरी गुन्ह्यात अडकणं, मुलगा ड्रग्स घेतोय हे पहिल्यांदा कळणं किंवा मुलगी लग्नागोदर प्रेग्नंट आहे असं काहीतरी घडणं. इथे तो प्रसंग समुद्राच्या साक्षीने समोर येतो. अगदी सर्वसामान्य माणूस होईल तसा तोही सैरभैर होतो, अस्वस्थ होतो, हिंसक होतो. आणि मग वेगवेगळ्या प्रहरी समुद्रकिनार्यावर जातो, रात्री दिवसा. समुद्राशी रिलेट होत राहतो. आणि असा होत होत समुद्रासारखा मोठा होतो.
बस एव्हढीच गोष्ट! तो कठीण प्रसंग म्हणजे बायकोचं अफेअर असतं! तसं ते काहीही असू शकतं! गोष्ट आहे त्याच्या मोठ्या होण्याची! स्पृहा जोशीने मस्तच काम केलंय. मध्ये मध्ये असणाऱ्या तिच्या कविता  आणि त्यांचं सादरीकरणही सुंदर ! पण चिन्मय मांडलेकर ने अक्षरशः तीन भूमिका साकारल्या आहेत. संशय असणारा धुसफूस करणारा नवरा, नंतरचा उफाळणारा आणि नंतर धीरगंभीर होत माणूस स्वतःला गवसलेला, समुद्राबरोबर समुद्रासारखा खूप मोठा होणारा जाणारा. ही खर्या अर्थाने त्याची गोष्ट आहे.
पूर्ण नाटकभर समुद्राची गाज येत राहते. रिसोर्ट रूमव्यतिरिक्त सेट नसूनही समुद्र जाणवत राहतो.


1 comment: