जुना
मित्र भेटला आणि आठवणी निघाल्या. आता हा काय करतो ती काय करते ह्यामधेच
बराच वेळ गेला. आमच्या लॉ कॉलेजला केरळी विद्यार्थी विद्यार्थिनी खूप
असायचे. त्यातला एकजण आमच्या एका मैत्रिणीमध्ये इंटरेस्टेड होता. तो कुठे
practice करतो असा विषय निघाला तर मित्र म्हणाला पक्का communist झालाय!
सतत तसल्याच पोस्ट्स असतात. मित्राला अच्छा म्हणाले आणि गाडीवर असेच अनेक
विचार सुरु झाले. ती मैत्रीण त्याला हो म्हणाली असती तर आत्ता काय करत असती वगैरे. घरातल्या एकदम धार्मिक पारंपारिक वातावरणातून असं communist वगैरे मध्ये adjust झाली असती का?
मला अमृता प्रीतमच्या पिंजरमधल्या पूरोची तीव्रतेने आठवण आली. फाळणीदरम्यान कित्येक स्त्रियांना खूप अत्याचार सहन करावे लागले त्यातलीच पूरो एक! पराधार्मियाकडून अपहरण, तीव्र धक्का, वेदना, असहायता, तत्कालीन परिस्थतीत घरच्यांकडून पुन्हा परतीसाठी मार्ग बंद आणि मग आयुष्याशी समायोजन करणे. पुढे स्त्रीच्या मनातली प्रेमाची मातृत्वाची उपजत भावना आणि मग मिळेल त्या मातीत मिसळुन जाण्याची तिची स्वाभाविक आदिम वृत्ती! स्वतःच केलेले परतीचे बंद मार्ग. अमृता प्रीतम ! तरल लेखिका! मला नुकत्याच बघितलेल्या सैराटची पण आठवण आली. घरातलं ऐश्वर्य, मानमरातब सोडून येऊन मी किडा मुंगीसारखं नाही रे जगू शकत म्हणणारी आर्ची! मिळालेल्या पहिल्या पाच पन्नास रुपयात दहा रुपयाचं घराच्या चित्राचं पोस्टर आणणारी, नवीन परिस्थितीत तगमग होणारी आणि शेवटी सर्व जबाबदारी स्वीकारून factory मध्ये काम करताना हैद्राबादी अबोलीचा गजरा माळणारी, चटकन भाषा अवगत करणारी, चाळवजा खोलीसमोर रांगोळी काढणारी, आईला अभिमानाने स्वतःचा आणि नवर्याचा पगार सांगणारी आर्ची! स्त्रिया अशा आहे त्या मातीत मिसळुन जातात. आणि पुरुष पार्यासारखे अलिप्त का राहतात? किंबहुना राहतात का? नसतीलही.... |
Tuesday, June 28, 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment