• बायका शिकल्या, नोकर्या करतात, कमावतात त्यामुळे आजकाल खूप डिवोर्सेस होताहेत.
• ह्यांना विचारून सांगते (डिस्कस करून नव्हे), ह्यांची परवानगी नाही, हे पाठवणार नाहीत • आमच्याकडे हे चालत नाही. आमच्याकडे हे अस्सच लागतं. (मला आवडत नाही तरी) • आमच्याकडे मला आवडते तरी अमुक अमुक गोष्ट अमुक अमुक वर्षात केली नाही कारण ह्यांना आवडत नाही. उदा. मागच्या पाच वर्षात थिएटर मध्ये जाऊन पिक्चर बघितला नाही किंवा हा हा पदार्थ केला नाही इ इ • investment का ? थांबा ह्यांना फोन देते. • त्याचं तसं काही नसतं तो परवानगी देतो मला काहीही करायला. • त्यानं मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. (joke! स्वातंत्र्य कोणी द्यावं लागतं का?”) • माहेरी हे वर्षातून एकदाच पाठवतात. (पाठवतात बापरे !!!) • ह्यांना दोन मुलं हवी होती. • मुलांकडे दुर्लक्ष होता कामा नये असं ह्यांना वाटतं. एक अंतहीन यादी ......... मध्यमवर्गीय सुशिक्षित बायका जेंव्हा असं बोलतात तेंव्हा वाटतं कुठल्याही आंदोलनापेक्षा बायकांनी स्वतःच्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडणं आजमितीला सर्वाधिक गरजेचं आहे. |
Tuesday, June 28, 2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment