Buddha In a Traffic Jam
आजादीचे नारे आणि देशाचे तुकडे करण्याची भाषा बोलणाऱ्या कॉलेज ‘कुमारांना’ किंवा
"स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला
काम नाय हाताला
भाकर नाय पोटाला
तोंड वर करून काय इचारतो मला ... ?
स्कोर काय झाला सांगा स्कोर काय झाला .... ??"
असे केवळ प्रश्न उपस्थित करून हातात काहीएक उत्तर नसणाऱ्या
व्यवस्थेविरुद्ध माओ, सोशालीस्ट आणि कम्युनिस्ट विद्रोही आंदोलनाचा पोकळ
निरर्थकपणा दाखवणारी कथा म्हणजे 'Buddha In Traffic Jam'.
आई
वडिलांपासून सुरु करून सतत प्रस्थापित गोष्टींविरुद्ध बंड करणाऱ्या आजच्या
पिढीला सोबत मिळाली आहे एका धारदार शस्त्राची ती म्हणजे सोशल मिडिया आणि
इंटरनेट. शस्त्र हे केव्हाही दुधारीच ! ते शस्त्र विक्रम पंडित वापरतोय.
'सो कॉल्ड' संस्कृती रक्षकांविरुद्ध तो फेसबुकवर एक कॅम्पेन चालवतो ज्याला
भरपूर प्रतिसाद येतो. पण बरोबरीने तो विचारीही आहे. पब मध्ये बसून,
पार्ट्या करत, गर्ल फ्रेंडबरोबर दारू पीत का होईना त्याला गरिबी, करप्शन
ह्यावर विचार करावासा वाटतो. सोशल मेडीयामुळे का होईना पण सध्याच्या
तरुणांचा हाही एक वैचारिक बदल पिक्चरमध्ये छान टिपलाय. पण त्याच्या
विद्रोही बोलण्याने त्याला एका माओवादी activity मध्ये involve करून
घ्यायचा प्रयत्न होतो.
पुढे पिक्चरमध्ये येतो तो अशा वैचारिक
अधिष्ठान नसणार्या विद्रोहाचा निरर्थकपणा आणि ज्या विचाराने अशा चळवळी सुरु
झाल्या असतील त्याचा पूर्णतः मागे पडलेला उद्देश, शेवट गरीब, असहाय
आदिवासी, मागास जनता ह्यांची पिळवणूक आणि ससेहोलपट.
बरोबरीने जे
आहेत ते व्यवस्थेचे प्रश्न आहेतच! मात्र इंटरनेट आणि सोशल मिडीया ह्याचा
चांगला उपयोग करूनही बरेच काही बदलू शकते आणि व्यवस्थेमध्ये राहूनच
व्यवस्था बदलता येऊ शकेल असा उत्तम संदेश नवयुवकांचा प्रतिनिधी विक्रम
पंडित देतो. वयाच्या एकविसाव्या वर्षी ज्या विचारांनी सुरुवात केली त्या
विचारांनी वयाच्या उत्तरार्धात का होईना काही उत्तर दिलं का ह्या प्रश्नावर
वैचारिक विद्रोही traffic jam मध्ये अडकलेल्या मानसिकतेतच राहतात.
पिक्चरमध्ये pottery म्हणजे मातीची कलात्मक मडकी करण्यासंदर्भात कथेचा एक
भाग येतो. नवीन पिढीमध्ये असणार्या क्षमता आणि pottery प्रमाणे त्याला
चांगला आकार देण्याची म्हणजे खोलवर, सर्वांगाने विचार करायला लावण्याची
गरजही हा सिनेमा दाखवतो. शेवटी खुद्द माओचेच एक वाक्य "Revolution is not a
dinner party" हे दाखवून सध्याच्या चालू विद्रोही चळवळींचा फोलपणाही
लक्षात आणून देतो.
नक्षलवादी, सोशालीस्ट, कम्युनिस्ट ह्यांच्या
समर्थकांनीही आणि विरोधकांनीही पहावा असा ''मस्ट वॉच'' आणि ''मस्ट
प्रमोटेबल" मुव्ही... Buddha in a traffic jam!!!
- विभावरी बिडवे
No comments:
Post a Comment