Sunday, August 23, 2015

आठवण

अनिल कुंबळे नंतर ह्या काही वर्षात क्रिकेटमधल्या कोणाविषयीच फार आस्था राहिली नाही. क्रिकेटमधले बारकावे काही कळत नाहीत त्यामुळे जो कोणी ज्या दिवशी चांगला खेळेल तो आपला फेवरेट. पण तरिही धोनी रिटायर झाला तर वाईट वाटलं. त्याच्या एका खेळाची आठवण सदोदित असते.
१९ फेब्रुवारी २००६ - आमचं लग्न होतं. बहुतेक त्या दिवशी भारत पाकिस्तान वन डे होती. आम्ही जोगेश्वरीला जाऊन घरी येत होतो. त्या दिवशी धोनीने खूप काहीतरी ग्रेट batting केली होती. आपण match तर जिंकलो होतोच पण धोनीच प्रचंड कौतुक होत होतं. मला आठवतं दुसऱ्या दिवशी पेपर मध्येही 'धो धो धोनी' अशी काहीतरी हेडलाईन आली होती. आम्ही येत असताना सगळीकडेच लोक खूप फटाके उडवत होते. बिल्डींगमध्ये आल्यावरही सोसायटीत आमच्यासाठीच्या वाजवलेल्या फटाक्यांव्यतिरिक्त खूपच फटाके वाजत होते. घरी आल्यावर मला चक्क एका काकांनी मी जरा awkward होऊन बसले असताना 'काय करायचय' असं विचारलं तर मी चक्क हाय लाईts बघायचेत सांगितलं आणि आम्ही टीव्ही लावलाही !!! माहेरहून सासरी येताना रडणं आणि उदासी तर होतीच पण धोनिमुळे जरा विसरल्यासारखं झालं. सगळीकडच्या फटक्यांनीही एकदम भारी वाटत होतं. :D
मला अगदी डीटेल्स लक्षात नाहीत कदाचित तो सामना भारत पाक नसून भारत आणि आणखी कोणीही असू शकेल.

No comments:

Post a Comment