चंदिगढ
काय सुंदर शहर आहे ! भारतातली पहिली planned city म्हणे ! (दुसरी कुठली
आहे देव जाणे!) छान चौकोनात आखलेले सेक्टर्स. त्यांना दिलेले exact
क्रमांक. व्यवस्थित लिहिलेले फलक. क्रॉस मध्ये छेडणारे मोठमोठाले रस्ते.
प्रत्येक रस्त्यावर दुभाजक. मध्ये एकतर मोठी झाडं किंवा शोभेची, फुलांची
झाडं, रस्त्याच्या दोन्ही बाजूला सर्विस रोड्स, सर्विस रोड्सच्या पलीकडे
फुटपाथ. प्रत्येक चौकात एक भलं मोठं सर्कल, त्यामध्ये
फुलवलेला छोटासा बगीचा. ट्राफिक अत्यंत सुटसुटीत. इतकं फिरलो पण कुठेही
jam झालेली बघितली नाही. ना एका सिग्नल ला एका वेळेपेक्षा जास्त थांबलो.
प्रत्येक सेक्टर्स मध्ये दुमजली बंगले किंवा कोठी. अगदी इंग्लंड मध्ये
असतात तसे. प्रत्येकाच्या भिंती लागून. प्रत्येक घराने ठेवलेली भली मोठी
गच्ची आणि अत्यंत प्रेमाने फुलवलेली फुलांची झाडं. घराला दिलेले मोठ्ठ्या
अक्षरातले क्रमांक. त्यात सदाशिव पेठेसारखं नवं जुनं काही नाही. प्रत्येक
सेक्टर्स मध्ये फक्त एका ठराविक ठिकाणी सगळ्या प्रकारची दुकानं, branded,
लक्ष्मी रोड सारखी, साधी, शोप्पिंग malls, खाण्याच्या सध्या टपर्या ते
चांगली हॉटेल्स, भरपूर शाळा, प्रत्येक सेक्टर्स ला स्वतंत्र बागा.
राहण्याच्या ठिकाणी फक्त घरं. त्या गल्लीत laundry वाल्याच्या टेबल शिवाय
एकही दुकान सापडणार नाही. ना सामोसा ना चाट वाल्याची गाडी. प्रत्येक
शोप्पिंग centreच्या ठिकाणी चौकोनात राखून ठेवलेलं हे भलं मोठ्ठ पार्किंग.
पार्किंग ला जागा मिळेल कि नाही ह्याचं टेन्शन नाही कि इथून पोलीस गाडी
उचलून नेतील कि काय ह्याचंही नाही. रस्त्यांवरून सगळ्याच ठिकाणी दुकानं
किंवा टपर्या नसल्यामुळे रस्त्यावर कुठेही गाड्या पार्क केलेल्या नाही कि
कुठेही no पार्किंग चे फारसे बोर्डही नाहीत. स्वच्छ रस्ते. सगळ्यात
महत्वाचं म्हणजे कुठेही जाहिराती, लेबल्स, फ्लेक्स नाहीत. अगदी एकही म्हणजे
एकही नाही. कसलीच जाहिरात नाही ना नेतेमंडळींचे मोठमोठाले फ्लेक्स कि
दागिन्यांच्या, कपड्यांच्या जाहिरातींची होर्डींग्स.
मोठ मोठ्या बागा, अप्रतिम रोज गार्डन, दगडांचा, फुटलेल्या काचांचा, फुटलेल्या टाइल्स चा अतिशय सुंदर वापर करून बनवलेल्या खूप सार्या मूर्ती, पुतळे, विविध आकार करून वसवलेली rock गार्डन, पिंजोर मुघल टाईप गार्डन.....
मी आपली पुण्यातला वाईट्ट वसलेला धनकवडी बालाजी नगर, सिंहगड रोडचा भाग आठवत राहिले, फ्लेक्स मुळे विद्रूप झालेलं कोथरूड आठवत राहिले. पुण्यात राहणं एकूणच अवघड होत जाणार आहे असं वाटत राहिलं. traffic मधून मुंबई airport च्या बाहेर पडेपडेपर्यंत दीड तास गेला. रात्री अकरा वाजता हिंजेवाडीच्या अलीकडे traffic jam लागला. आपल्या आपल्या शहरात आलं कि रुटीन सुरु होत. ८-९ दिवसांच्या gap नंतर आता वृत्तपत्र हातात घ्यायलाही नको वाटतंय. मोदींनी कॅनडात काय केलं, सामज्ञाचा सुट्टीचा कॅम्प, दोन अडीच महिने तिचं मन रमवायला हवं, घराला रंग काढायचाय, जुनं समान काढून टाकायचंय, प्रचंड आवरा आवरी, स्वैपाकघर बदलून टाकायचंय, कोर्टात एक अवघड argument, चैत्र गौरीची सवाष्ण राहिलीये, पाहुणे येणार आहेत, काही रंग आणून ठेवलेत ते वाळायच्या आत काहीतरी उपयोग करायला हवा, न संपणारी व्यवधानं.... त्यातून ह्या कोथरूडच्या प्रदूषणातच राहायचंय असं समजावण्यात आता आजचा आख्खा दिवस जाणार आहे.

No comments:
Post a Comment