To be or not to be
That is the question !
खायला द्यावी कि देऊ नये हा एकच सवाल आहे.
ह्या घरातल्या फडताळावर पडलेली
शिजवावी बेशरम लाचार आनंदानं
कि फेकून द्यावं हे पिवळ पाकीट
त्यात गुंडाळलेल्या शिसाच्या असल्या नसल्या जाणीवेसाहित
डस्टबिनच्या काळ्याशार पिशवीमध्ये
आणि करावा सगळ्याचाच शेवट एकाच प्रहाराने
नेस्टलेचा, तुझ्या चवीचा आणि माझ्या वाचलेल्या वेळेचा...
lab tests च्या रिपोर्ट्स ने कंपनीला असा डंख मारावा कि
नंतर येणाऱ्या पदार्थांना नसावा अग्राह्य पदार्थांचा गंधही
पण पण त्या पदार्थानाही पुन्हा चवीचं स्वप्न पडू लागलं तर ?
तर – इथेच तर मेख आहे.
जुन्या पदार्थांच्या वाटेला जायचा धीर होत नाही
आणि म्हणून सहन करतो ही नवीन निद्रा
प्रेताच्या निर्जीव्पणाने शरीरावर होणारे अत्त्याचार
आणि अस्तित्वाच्या गाभार्यात असलेल्या सत्याची विटंबना
आणि अखेर हातात कटोरा आणि फोर्क घेऊन उभे राहतो
खालच्या मानेने आमच्या मारेकराच्याच दाराशी .

No comments:
Post a Comment