सहसा
खूप नकारात्मक वाचन, विचार आणि लिहायचही मी टाळत असते. पण आज आठवलंच.
practice सुरु केली तेंव्हाची अगदी नवीन नवीन गोष्ट. एका मित्राकडे एका
महिलेला आत्महत्त्येला प्रवृत्त केल्याबद्दल नवरा, सासू सासरे दीर नणंद
ह्यांच्यातर्फे केस आली होती. दोन्ही घरची प्रचंड गरिबी. लग्नाला जेमतेम
५-6 वर्ष झाली होती आणि त्या स्त्रीची प्रचंड छळवणूक झाली होती. पदरी दोन
चिमुरड्या मुली. मुलगा हवा म्हणूनही छळ. आई वडिलांना
तिचा त्रास माहित होता पण एकदा मुलगी लोटली कि तिने तिथेच adjust करावं
आणि पुन्हा परत आलेली मुलगी म्हणजे ओझं त्यामुळे ते दुर्लक्ष करत होते.
तिने आत्महत्त्या केल्यावर मात्र आई वडिलांनी चवताळून जाऊन पोलीस कम्प्लेंट
केली. आरोपींना अटक वगैरे झाली मग जमीनही झाला. मात्र केस उभी राहीपर्यंत
वाटाघाटी सुरु झाल्या. शेवटी मुलगी तर आता गेलीच आहे ती काही परत यायची
नाही आणि ह्यांच्याविरुद्ध कम्प्लेंट अशीच ठेवली तर दोन नातींच काय होईल,
पुन्हा आपल्याच गळ्यात पडतील कि काय ह्या भीतीने अक्षरशः त्या दोन नातींना
सासर कडचे सांभाळतील ह्या अटीवर आई वडिलांनी कोर्टात जबानी फिरवली. म्हणजे
अशा स्टेटकेसेस मागे तर नाही घेता येत मग फितूर व्हायचं ! 'फार काही त्रास
नव्हता, मजेत होती तशी, सासरचे कौतुक पण करायचे किंवा तिच थोडी जास्त
sensitive होती' अशा प्रकारची statements दिली कि केस फिरते आणि 'संशयाचा
फायदा' मिळून आरोपी सुटतात तसे तेही सुटले.
थोड्याश्या फायद्याकरिता आपल्या मुलीचा ज्यांनी बळी घेतला त्यांना सोडून दिलं गेलं. नुकतीच कॉलेज मधून बाहेर पडल्यानंतर हे असं काही वास्तव समोर आलं तेंव्हा मी खूप हादरले होते. नंतर नंतर चिक्कार सवय झाली. मोटर वेहिकल अक्सिडेंट केसेस मध्ये अपघाती माणसाला किंवा मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना इन्शुरन्स कंपनीकडून भरपाई मिळते त्यात पर्सेंट वर पैसे घेणारे वकील, मिळण्याच्या दिवशी आजूबाजूला फिरणारे शिपाई, विरुद्ध पार्टीज कडून settlement साठी पैसे उकळणारे वकील आणि बरंच काही बघितलं. पण आज mothers day निमित्ताने ही केस खूप आठवली.

No comments:
Post a Comment